Posts

Showing posts from May, 2022

बहिर्जी

#बहिर्जी_नाईक_एक_अज्ञात_थोरपण १०-१० दिवसअन्नपाण्या शिवाय राहतो,तर महिना महिना भर एकाच झाडावर दबा धरुन बसतो…! धावायला लागला तर वाऱ्याच्या कानफाटीत मारल्यासारखे धावतो,पुराच्या डोहात खुशाल उडी मारतो..! तलवार,भाला,फरीगगदा,पट्टा, विटटा,धनुष्य,असे काही चालवतो की समोर महासागर येऊदे शत्रूचा…! शत्रूच्या राणीवशात जाऊन राहू शकतो,तर खुद्द औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्यालाच कव्वाली ऐकवून बक्षीस घेऊन येऊ शकतो…! माणूस म्हणाल तर एकही माणसाचा गुण नाही,जनावर म्हणाल तर दिसतो माणसासारखा..! मोठमोठ्या गोष्टीत अचूक निर्णय,सावध नियोजन आणि स्वतःच्या देखरेखीखाली प्रत्यक्षघोडदौड…!खरं सांगतो गड्यांनो…हा बहिर्जी नाईक जणू शिवरायांचा तिसरा डोळाच होता..! आणि शिवराय त्याला इतके मानत की महाराजांच्या राणीवशात एकमेव जिजाऊ माँसाहेब सोडून कोणी विना परवाना जाऊ शकत असतील ते म्हणजे बहिर्जी नाईक…! गड्यांनो,महाराजांचा नाईकांच्यावर इतका विश्वास की हा माणूस चुकून सुद्धा चूक करु शकणार नाही इतका दृढ विश्वास…! पाची पातशाहिना रणांगणात चारी मुंडी चित करुन जेव्हा महाराज राज्याभिषिक्त झाले तेव्हा सुद्धा बहिर्जी नाईक समोर येऊ शकत नव्हते इ...

वातावरण निर्मिती

Image
* वातावरण निर्मिती * एखाद्या कामाची सुरुवात करण्यासाठी किंवा त्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी वातावरण निर्मितीची खूप गरज असते असं म्हटलं जातं; पण हे वातावरण म्हणजे काय हेच कळत नव्हतं. आजही पूर्णपणे कळत नाही, परंतु जेवढं अनुभवलं तेवढं लिहिण्याचा हा प्रयत्न.      ‌जून १९८८ मध्ये श्री भैरवनाथ शिक्षण संस्था, पोहाळे या संस्थेची स्थापना झाली आणि जून १९८९ पासून इयत्ता आठवीचा वर्ग तेथे सुरू झाला. भौतिक सोयी सुविधांची जुळणी करत करतच शाळा सुरू होती. एक एक वर्ष वाढू लागलं आणि वर्ग वाढू लागले तशी मनुष्यबळाची गरज भासू लागली. मनुष्यबळ उपलब्ध होत गेले. त्यावेळी या शिक्षण संस्थेचे बहुतेक संचालक शासकीय-निमशासकीय सेवेत होते, त्यामुळे शाळेसाठी खास असा वेळ देता येत नव्हता. या दृष्टिकोनातून एकदा संचालक मंडळाच्या बैठकीत विषय निघाला आणि प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत असणाऱ्या सहा संचालकांपैकी कुणीतरी शैक्षणिक अर्हता प्राप्त करून शाळेकडे यावे असे ठरले. त्यानंतर माध्यमिक शाळेसाठी आवश्यक असणारी पुढील शैक्षणिक अर्हता म्हणजे बी.एड. प्रवेशासंबंधी चौकशा सुरू झाल्या. योगायोगाने त्यावेळी...

तिच्यासाठी

. *तिच्यासाठी* रानीवनी फिरलो मी एकांतात झुरलो मी ठार वेडा ठरलो मी तिच्यासाठी वाट सुद्धा पाहिली मी पत्रे किती लिहिली मी लक्ष गाणी गाईली मी तिच्यासाठी घरी थापा मारल्या नि तिच्या म्हैशी चारल्या मी गाभूळ चिंचा चोरल्या मी तिच्यासाठी आजोळाला गेलो नाही आई-बाला भ्यालो नाही शाळा पुरी केलो नाही तिच्यासाठी मित्र सारे तोडले गा गुपितही फोडले गा खरे बोलणे सोडले गा तिच्यासाठी अखेरच्या भेटीवेळी तिने होती केली खेळी बोल्ली फक्त दोन ओळी  झालो मामा                    *© रमेश*   

मनोरमा रमाबाई बिपीन मेधावी

Image
1880 में भाई की मौत के बाद रमाबाई ने बंगाली वकील, बिपिन बिहारी दास से शादी कर ली। इनके पति एक बंगाली कायस्थ थे, और इसलिए शादी अंतर्जातीय, और अंतर-क्षेत्रीय थी। दोनों की एक पुत्री हुई जिसका नाम मनोरमा रखा। विसाव्या शतकाच्या अखेरीस पंडिता रमाबाईंच्या रूपाने महाराष्ट्रात एक वादळ आले होते. सामाजिक, राजकीय, धार्मिक, संस्कृती आणि साहित्य या क्षेत्रात हे वादळ चार दशके घोंघावत राहिले. रमाबाई डोंगरे यांचे कोकणस्थ चित्पावन ब्राम्हण असलेले कुटुंब कर्नाटकात स्थायिक झाले होते. आई-वडिलांबरोबर मद्रास इलाख्यात गेल्यानंतर बंगाल आणि ओरिसामार्गे हे वादळ महाराष्ट्रात आले तेव्हा आपल्याबरोबर एक छोटीशी पणतीही घेऊन आले होते. रमाबाईंनी आपल्या कार्यासाठी पुण्यात स्थायिक होण्याचे ठरविले तेव्हा त्यांच्या लाडक्या कन्येने, मनोरमाने नुकतेच एक वर्ष पूर्ण केले होते. आपल्या मायेच्या पंखाखाली या पणतीला घेऊन देशात, परदेशात संचार करताना ही पणती सतत तेवत राहील याची काळजी या वादळाने घेतली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पुणे सोडून केडगावात स्थिर झाल्यानंतर या वादळाची तीव्रता कमी झाली. त्यानंतर अनाथ महिला, बालविध...

शाहूमहाराज मला का भावतात.....?

Image
१) भारतातील संस्थाने आणि राजे त्यांच्या वर्तनाने लोकांच्या संतापाचे कारण ठरले.पण शाहू महाराजानी राजेपणाची व्याख्याच बदलून टाकली..कल्याणकारी राज्य कसे असते याचा वस्तुपाठ घालून दिला.. २) राजकीय स्वातंत्र्य अगोदर की सामाजिक सुधारणा अगोदर ? असा वाद महाराष्ट्रात झाला पण राजकीय व्यवस्थेतून सामाजिक सुधारणा किती प्रभावीपणे अंमलात येऊ शकतात याचा प्रत्यय त्यांनी आणून दिला ३) पुरोहित आणि राजे अशी सांगड सर्वत्र असताना  ती तोडून पर्यायी धर्मपद निर्माण करण्यापर्यंत आव्हान पुरोहितशाहीला दिले हे राजसत्तेने क्वचितच केले होते ४) ज्या सुधारणा करण्यासाठी आज आपण झगडतो त्या अगदी त्यांनी सहज करून दाखवल्या.आज लग्नाचे मुलींचे वय १८ की २१ हा वाद सुरू असताना त्यांनी १९१९मध्ये मुलींच्या लग्नाचे वय १४ केले पण आज १०० वर्षांनी आपण त्या वयापुढील बालविवाह ही थांबवू शकलो नाही.   ५) शिक्षण हक्क कायदा आणायला देशाला २००९ साल लागले पण महाराजानी ९२ वर्षे अगोदर (१९१७ला)करून दाखवले  मुले न शिकवणाऱ्या पालकांना शिक्षा करण्याची आज हिंमत नाही . हे त्याकाळात करून दाखवले.आजही पुरेशी वसतिगृहे नसताना त्याकाळ...

पंडिता रमा बिपीन मेधावी स्मारक

Image