आम्ही सारे कवी
. *आम्ही सारे कवी* नसे आम्हाला भ्रांत कशाची आम्ही सारे कवी | मश्गुल आपली लिहिण्यामध्ये रोज कविता नवी || उखडून गेले रस्ते सस्ते झाले सगळे जिणे | कुठे पाखरे खाऊन गेली कणसांमध्ये दाणे || उरी पिशांची आस घेउनी बुजगावण्याची छवी || स्वार्थाच्या आंधळ्या लढाया लुटूपुटूच्या चाली | पोळी भाजण्या होळी करुनी निवांत बसतो खाली || वैराग्याचे सोंग काढी निर्मोह जगा भासवी || घडत्या अपराधाची न पर्वा सर्वा स्वार्थाची मोहिनी | खाते कुत्रे पीठ उगीचच दळते आंधळी जनी || चिकटून नाही येत करुणा मुळी उरातच हवी || *रमेश कुरलीकर*