शाहूमहाराज मला का भावतात.....?


१) भारतातील संस्थाने आणि राजे त्यांच्या वर्तनाने लोकांच्या संतापाचे कारण ठरले.पण शाहू महाराजानी राजेपणाची व्याख्याच बदलून टाकली..कल्याणकारी राज्य कसे असते याचा वस्तुपाठ घालून दिला..

२) राजकीय स्वातंत्र्य अगोदर की सामाजिक सुधारणा अगोदर ? असा वाद महाराष्ट्रात झाला पण राजकीय व्यवस्थेतून सामाजिक सुधारणा किती प्रभावीपणे अंमलात येऊ शकतात याचा प्रत्यय त्यांनी आणून दिला

३) पुरोहित आणि राजे अशी सांगड सर्वत्र असताना  ती तोडून पर्यायी धर्मपद निर्माण करण्यापर्यंत आव्हान पुरोहितशाहीला दिले हे राजसत्तेने क्वचितच केले होते

४) ज्या सुधारणा करण्यासाठी आज आपण झगडतो त्या अगदी त्यांनी सहज करून दाखवल्या.आज लग्नाचे मुलींचे वय १८ की २१ हा वाद सुरू असताना त्यांनी १९१९मध्ये मुलींच्या लग्नाचे वय १४ केले पण आज १०० वर्षांनी आपण त्या वयापुढील बालविवाह ही थांबवू शकलो नाही.
 
५) शिक्षण हक्क कायदा आणायला देशाला २००९ साल लागले पण महाराजानी ९२ वर्षे अगोदर (१९१७ला)करून दाखवले 
मुले न शिकवणाऱ्या पालकांना शिक्षा करण्याची आज हिंमत नाही . हे त्याकाळात करून दाखवले.आजही पुरेशी वसतिगृहे नसताना त्याकाळात करून दाखवली 

६) विधवा विवाह आजही फारसे होत  नाहीत,समाजाची मानसिकता नकारात्मक आहे. १९१६ मध्ये त्यांनी विधवा विवाह कायदा केला.हे धाडस खूप काळाच्या पुढचे होते 

७) भटक्या जमातींना आजही गुन्हेगार समजून त्यांच्यावर  हल्ले होतात.नेहरूंनी येऊन १९५२ ला गुन्हेगारी कलंक पुसला पण महाराजानी ते ३४ वर्ष अगोदर करून दाखवले

८) महारोग्यांची वेदना बाबा आमटेच्या आनंदवनानंतर  आपल्याला कळली पण महाराजानी १८९७ सालीच महारोग्यासाठी आश्रम काढला 

९) शेतकरी आत्महत्या होताना अजूनही तो राज्यकर्त्यांचा प्राधान्यक्रम होत नाही.पण सिंचन,दुष्काळ उपाययोजना,  हे त्या काळात करून दाखवले 

१०) औद्यीगिकीकरण रोजगार यावर  आज परिसंवाद फक्त होताना ते केव्हाच महाराजानी  करून दाखवले

११) मर्यादित भौगोलिक क्षेत्रात किती अमर्यादित काम करता येऊ शकते ? याचे महाराज प्रतिक ठरले...

एक राज्य किती कल्याणकारी असू शकते याने आपण थक्क होतो ... 

वंदन या राजाला....

Comments

Popular posts from this blog

My Biodata Full

पर्जन्य मापक यंत्र नववी भूगोल *वृष्टी* पाठासाठी उपयुक्त सामग्री.