तिच्यासाठी

. *तिच्यासाठी*

रानीवनी फिरलो मी
एकांतात झुरलो मी
ठार वेडा ठरलो मी
तिच्यासाठी

वाट सुद्धा पाहिली मी
पत्रे किती लिहिली मी
लक्ष गाणी गाईली मी
तिच्यासाठी

घरी थापा मारल्या नि
तिच्या म्हैशी चारल्या मी
गाभूळ चिंचा चोरल्या मी
तिच्यासाठी

आजोळाला गेलो नाही
आई-बाला भ्यालो नाही
शाळा पुरी केलो नाही
तिच्यासाठी

मित्र सारे तोडले गा
गुपितही फोडले गा
खरे बोलणे सोडले गा
तिच्यासाठी

अखेरच्या भेटीवेळी
तिने होती केली खेळी
बोल्ली फक्त दोन ओळी 
झालो मामा 

                  *© रमेश*
  

Comments

Popular posts from this blog

My Biodata Full

पर्जन्य मापक यंत्र नववी भूगोल *वृष्टी* पाठासाठी उपयुक्त सामग्री.