Posts

Showing posts from April, 2022

लामण दिवे-३ : सदानंद कदम

Image
*लामणदिवे : तीन* सांगलीत अखिल भारतीय साहित्य संमेलन भरणार होतं. संमेलनाची स्मरणिका आणि त्या अनुषंगानं प्रकाशित करावयाच्या काही पुस्तिका यांचं संपादन करण्याच्या कामात मी सहभागी होतो. त्या पूर्वीची संमेलनं आणि त्यावेळच्या अध्यक्षांनी केलेल्या भाषणांमधील उताऱ्यांची एक पुस्तिका काढायची होती. त्यासाठी जुन्या कागदपत्रांचा पसारा मांडला होता. माध्यमांमधूनही तसं आवाहन करण्यात आलं होतं. ते वाचून एक आजी भेटायला आल्या होत्या. ऐंशी ओलांडून गेलेल्या त्या आजी. किरकोळ देहयष्टीच्या. गोऱ्यापान. सुती पातळातल्या. हातात एक कापडी पिशवी. त्यात कोंबून भरलेली वृत्तपत्रांची कात्रणं. या आजींनी पिशवीतून काय आणलं असावं या विचारात पडलेला मी.  आजींनी बैठक मारली आणि पोतडीतली कात्रणं बाहेर काढून माझ्यासमोर ठेवत त्या म्हणाल्या, "ही गेल्या पन्नास वर्षांतली कात्रणं. त्या त्या वेळच्या साहित्य संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचे वृत्तांत यात छापून आलेत. ही कात्रणं ताब्यात घ्या आणि मुख्य म्हणजे तुमचं काम झालं की मलाच परत द्या." मी ते घबाड लगेच ताब्यात घेतलं. आजींचा पत्ता लिहून घेतला आणि त्यांना निरोप दिला. ज्...

लामण दिवे-२ : सदानंद कदम

Image
*लामणदिवे : दोन* दीड वर्ष डफळापूरला काढून मी मिरज तालुक्यात बदलून आलेलो. तीस वर्षांपूर्वी. तेव्हाचे प्रभारी शिक्षणाधिकारी काही सामाजिक कामामुळं ओळखीचे झालेले. राज्य स्तरावरचं विज्ञान प्रदर्शन सांगलीत भरणार होतं. या प्रदर्शनाची प्रसिद्धी करणं आणि माध्यमांतून काही बातम्या देणं यासाठी त्यांना 'लिहिणारा' शिक्षक हवा होता. मी तेव्हा दैनिकांतून आणि आकाशवाणीसाठी लिहायचो. एवढ्या एकाच गोष्टीमुळं त्यांनी मला मिरज तालुक्यात बदलून घेतलेलं. एरवी घसघशीत वजनदार गठ्ठा हातावर पडल्याशिवाय कुणाच्याही बदली आदेशावर त्यांच्या लेखणीतून त्यांच्या नावाची अद्याक्षरंच उमटत नसत असं ऐकिवात होतं. ( तेव्हा बदली हा विषय जिल्हा स्तरावरून हाताळला जायचा. ) गड्याच्या हातावर वजन पडलं तर मात्र दिलेला शब्द ते खाली पडू द्यायचे नाहीत असंही कानावर यायचं. पण त्यांच्या कामाचा उरक दांडगा. माणूस मैत्रीलाही पक्का. पद विसरून मैत्री निभवायचा. माझं मैत्र जुळलं ते त्यामुळंच. दिसायलाही रुबाबदार. बुलेटशिवाय फिरायचा नाही. फौजदारच वाटायचा.  यथावकाश प्रदर्शन पार पडलं. आकाशवाणीच्या सुभाष तपासेसाहेबांनी तेव्हा स्वत: मैदान...

लामण दिवे-१ : सदानंद कदम

Image
*लामणदिवे* पंचवीस-तीस वर्षं झाली असतील आता या गोष्टीला. शिक्षण विभागात गडबड सुरू होती. बहुतेक त्या दिवशी शिक्षणाधिकारी कुठं तरी भागांत जाणार असाव्यात. शाळा भेटीसाठी. कारण त्या दिवसापासून सातवीची केंद्र परीक्षा सुरू होणार होती. दोन-तीन विस्तार अधिकारी बाई कधी बाहेर पडतात याचीच वाट पाहत होते. बाईंनी त्यांनाही बरोबर यायला सांगितलं होतं. जिल्हा परिषदेच्या मागच्या दाराला बाईंची जीप लावून चालक मारुती पान-तंबाखू चघळत उभाच होता. काळाकरंद. बुटका. बटबटीत डोळ्यांचा, गोबऱ्या गालांचा. दिवसभर जीप चालवायचा. रात्री पायलट व्हायचा.  आज जशी शालान्त परीक्षा होते, तशी तेव्हा सातवीची परीक्षा व्हायची. केंद्र शाळेत... तेव्हा त्या शाळेला 'तालुका शाळा' नाहीतर 'पगार शाळा' म्हणत. अशा शाळेत आजूबाजूच्या पाच-सहा शाळांतील विद्यार्थी परीक्षा द्यायला येत. इतरही काही शाळेत परीक्षा केंद्रं असायची. रोजची शाळा बदलल्यानं मुलांच्या मनावर दडपण येत असे. तसं ते त्यांच्या शिक्षकांच्याही मनावर असे. कारणं दोन-तीन. एक म्हणजे आपण सगळा पाठ्यक्रम नीट शिकवलाय आणि तो मुलांच्या गळी उतरलाय याची खातरी नसे. दुसरं...

मुलंच मुलं : संजय हळदीकर

Image
*भावभावनांच्या आविष्कारात जाणिवांचा अंतर्भाव असलेले पुस्तक : मुलंच मुलं* ================ साहित्यातून भावनांचा आविष्कार होत असतोच पण त्यात जाणिवांचा अंतर्भाव जेव्हा होतो तेव्हा *मुलंच मुलं* सारखा वेगळ्या धाटणीच्या ग्रंथ साकारतो.  संजय हळदीकर हे नाव रंगभूमीशी अतूट बंधनांनी जोडलेलं आहे. कला क्षेत्रात नवनवे प्रयोग सातत्याने चालवणारा दिलखुलास अवलिया म्हणून ते ओळखले जातात. मुलंच मुलं या भाग्यश्री प्रकाशन कोल्हापूरने प्रकाशित केलेल्या त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून ते नऊ नवलकथा चित्रपटांचे कलादर्शन करताना मनावर ठसले पाच व्यक्तिमत्त्वांचा पंचामृत आणि अनुभव वर्ग त्याचा नकाशा सुगंधित फूलांचा गुच्छ याची वाचकांच्या शिदोरीत भर घालतात. मनाच्या अस्वस्थतेतून कागदावर उमलेली ही शब्दफुले आहेत. 'अंतःकरणाला जोडणारा कथांचा सेतू' अशा उद्धरणात पत्रकार अरुण खोरे यांनी या गद्य संग्रहाची भलावण केली आहे. ती नेमकी आणि अचूक वाटते.  पुस्तकातील आशय नेमकेपणाने स्पष्ट करणारे वेधक आणि बोलके असे मुखपृष्ठ साकारले आहे चित्रकार विजय टिपुगडे यांनी. तर आतील आकर्षक रेखाटनांनी पुस्तकाच्या सौंदर्यात भर घा...

देवमाणसं : माणसातले देव

रामचंद्र देशिंगकर सुनीलकुमार लवटे तात्यासाहेब कोरे ़

गुढीपाडवा

Image
विनासायास सरतील वर्षे लोक उभारतील गुढ्या जुन्याच काठीवर   आपण किती दिवस  पाहणार आहोत  क्षितिजावरचा अंधार संचित, प्रारब्ध, भोग अशा कुबड्यांच्या आधाराने लागलो चालू... तर एक दिवस अंधाराच्याही पलीकडील काळोखात रवानगी झालेली असेल पंखात बळ, मनगटात हिंमत आणि छातीत धैर्य  आहे तोवरच पायाखालच्या वाटा तुडवून पूर्ण करायला हवा  हा प्रवास  कोणी येईल मदतीला त्याची वाट न बघता नाहीतर  शेवट ठरलेलाच आहे नाटकाचा  मग 'कपाळावरच्या रेषा घडवत नाहीत नशीब ते घडवतात मनगटं' या वचनावरचा विश्र्वासच उडून जाईल  वेळ कधीच गेलेली नसते जेव्हा वाटसरू  तिच्या हातात हात घालून मार्गक्रमण करत राहतो अदम्य उत्साहाने सोनेरी स्वप्नांचा  पाठलाग करत राहतो पंखात वारा भरत राहतो एकेका पावलागणिक नव्या स्वप्नांच्या शोधात. *................रमेश*

पुस्तकाचे दर ६४ ते १४४ पाने (100 to 1000 copies)

Image